BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon maval : माळेगाव ते भीमाशंकर पावसाळी ट्रेकिंगचा अनुभव

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील गड भटकंती ग्रुप यांच्यासह वडगाव व खडकी डेपो येथील गिरीप्रेमी युवक अशा 51 जणांनी माळेगाव ते भीमाशंकर २९ किमी पदभ्रमण करून निसर्गाचा आनंद लुटला.

वडगाव ते माळेगाव गाडीने प्रवास केला. त्यानंतर 9 तास पदभ्रमण करून भीमाशंकर देवस्थान येथे पोचले. घनदाट जंगलामधून, डोंगर कपारींमधून मार्ग काढत वाटेत पक्षांचा किलबिलाट ऐकत त्यांचा प्रवास झाला. वाटेत सोबत आणलेला नाश्ता आणि जेवण उरकले. या प्रवासात अनेक छोटे मोठे धबधबे देखील पहायला मिळाले. देवदर्शन करून सर्वजण परतीच्या प्रवासाला लागले. रात्री 11 वाजता वडगाव येथे पोचले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3