Vadgaon Maval : टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यांचे पद रद्द

एमपीसी न्यूज- ग्रामपंचायत हद्दीमधील मिळकतकर मुदतीमध्ये भाला नाही म्हणून उच्च न्यायालयाने टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. अश्विनी शिवाजी असवले आणि मीना सुरेश असवले अशी या महिला ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत.

टाकावे ग्रामपंचायतीची निवडणूक 4 ऑगस्ट 2015 रोजी झाली होती. या निवडणुकीत दोन्ही सदस्या विजयी झाल्या होत्या. या निकालाविरुद्ध उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. गायकवाड यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर गायकवाड यांनी आयुक्तांकडे अपील केले होते. आयुक्त डुंबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णय रद्दबातल करून गायकवाड यांच्याबाजूने निकाल देऊन दोन्ही महिला सदस्याचे पद रद्द केले होते. त्यानंतर असवले यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. उच्च न्यायालयाने आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत दोन्ही महिला सदस्यांचे पद रद्द केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.