Vadgaon Maval : गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि. 21) तळेगाव-चाकण फाट्याजवळ केली.

सूरज भरत पिंगळे (वय 20, रा.भीमाशंकर सोसायटी, विठ्ठलवाडी, देहूगाव), साहिल संदीप सातव (वय 18, रा. येलवाडी, ता. राजगुरूनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळेगाव-चाकण फाट्यावर दोन तरुण संशयितरित्या आढळून आले. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांची अंगझडती घेतली असता सुरज याच्या जवळ एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 25 हजार 200 रुपयांचा ऐवज मिळाला. त्यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांना तापासाठी वडगाव मावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हे पिस्तूल तरुणांकडे कुठून आले, त्याचा वापर ते कशासाठी करणार होते; याबाबत वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.