Vadgaon Maval : वडगाव बार असोसिएशनतर्फे संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- वडगाव बार असोसिएशनतर्फे वडगाव मावळ न्यायालयामध्ये सोमवारी (दि. २६) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वडगाव मावळ न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, वडगाव बार असोसिएशनचे सर्व वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीशांच्या हस्ते संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सह न्यायाधीश आर के गायकवाड यांनी संविधान वाचन केले. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वडगाव बार असोसिएशनतर्फे सर्व न्यायाधीशांना संविधान प्रतिमा व संविधान प्रत भेट देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख न्यायाधीश श्री. पुरी, सह न्यायाधीश आर के गायकवाड, आर आर कुलकर्णी, एस ए कुलकर्णी, श्री. जतकर, वडगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष वाय पी गोरे, उपाध्यक्ष अॅड. प्रताप शेलार, सचिव घनश्याम दाभाडे, खजिनदार अविनाश पवार, अॅड. रंजना भोसले, अॅड. रवींद्रनाथ दाभाडे, अॅड. अजित वाहिले, अॅड. सुद्धा डिमळे, अॅड. चेतन जाधव, अॅड. खळदकर, अॅड. नागेश, अॅड. कौशल, अॅड. यादव, अॅड. वांद्रे, अॅड. फुगे तसेच पक्षकार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.