Vadgaon Maval : वडगाव शहराचा पुढील तीस वर्षांसाठीचा विकास आराखडा सादर

एमपीसी न्यूज – मुंबई आयआयटी या संस्थेकडून सुनियोजित वडगाव शहरासाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा (DPR) शनिवारी (दि 7) सादर करण्यात आला. यामध्ये पाणी,सांडपाणी,पावसाचे पाणी,घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. तसेच वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुढील तीस वर्षांसाठी आराखडा तयार करण्‍यात आला असून संबंधित संस्थेचे अधिकारी, इंजिनीयर यांच्याशी याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली.

यावेळी नगरपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शंकाचे निराकरण मुंबई आयआयटीच्या प्रोफेसर बकुल राव तसेच इंजिनीयर मेघराज गरुड यांनी केले.

या नियोजनबद्ध विकास आराखड्याचे सादरीकरण झाल्यानंतर नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्याकडून या चारही विकास आराखड्याची मंजुरी येणाऱ्या जीबीमध्ये घेऊन आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पालकमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे सादर करून वडगाव शहराच्या विकास आराखड्यासाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास व्यक्त करून या चारही विकास आराखड्याचे डिझाईन वडगाव शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये तयार करण्याचे सर्वांच्या वतीने ठरविण्यात आले.

यावेळी मुंबई आयआयटीचे अधिकारी, इंजिनियर,वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी सर्व नगरसेवक,नगरसेविका तसेच अभियंता,इंजिनीयर,अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.