Vadgaon Maval : वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे दिलीप करंडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष दिलीप करंडे यांचा वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा अॅडव्होकेट्स बार स्थापन करण्यामागची संकल्पना सांगितली.

करंडे म्हणाले, “‘वन बार वन वोट’ न्यायालयाच्या या आदेशामुळे तालुका बारचे महत्व कमी झाले होते. त्यामुळे सर्व तालुका बारला एकत्र करून वकिलांचे सर्व प्रश्न सोडविणे करीत सदरच्या पुणे जिल्हा अॅडव्होकेट्स बार असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली आहे. या असोसिएशन मार्फत वकील संरक्षण कायदा लागू करणे कामी प्रयत्न करणे, जुनिअर वकिलांना मानधन मिळवून देणे तसेच बार बेंच रिलेशन मजबूत करणे, तालुका बारचे सर्व प्रश्न सोडविणे. उदा. सत्र न्यायालय, लायब्ररी , ई लायब्ररी, इमारत, वकिलांचे प्रश्न करीत जिल्हास्तरीय संमेलन घेणे. जुनिअर वकिलांकरिता कार्यशाळा घेणे, वकील विमा इत्यादी कल्याणकरी योजना राबविण्याकरिता प्रयत्न करणार आहे.”

त्यावेळी त्यांच्यासमवेत अॅड. सुभाष कड, अॅड. पोपटराव तांबे, अॅड. पी. डी. उमाप उपस्थित होते. तसेच वडगाव बार असोसिएशनचे अॅड नामदेव दाभाडे, सचिव अॅड सोमनाथ पवळे, अॅड विठ्ठल पिंपळे, अॅड. संतोष गुंजाळ, अॅड. खंडूजी तिकोने, अॅड. रंजना भोसले, अॅड. एल. एम. कौशल, अॅड. दीपक चौधरी, अॅड. धनंजय कोद्रे, अॅड सुरेखा पाटील, अॅड रेश्मा घोजगे, अॅड राम शहाणे, अॅड सुधीर भोंगाडे, अॅड, गणेश जगताप, अॅड अभय पळनीटकर, अॅड विनायक डुबल आदी वकील वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.