Vadgaon maval : वडगाव मावळ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस ए मुळीक यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी एस ए मुळीक यांची नेमणूक झाल्याबद्दल वडगाव मावळ लिगल प्रक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वडगाव मावळ लिगल प्रक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल दगडू पिंपळे, उपाध्यक्ष अॅड धनंजय कोद्रे , अॅड सोमनाथ पवळे, सेक्रेटरी अॅड मुनाफ शेख, अॅड सुधीर भोंगाडे, खजिनदार अॅड दीपक चौधरी, सदस्य अॅड स्वामी फुगे, अॅड रेश्मा घोजगे, अॅड तन्वीर जहागीरदार, अॅड सारिका पडवळ, अॅड नेहा बुटाला, अॅड संतोष गुंजाळ, अॅड दिनेश शेलार, अॅड भोसले मॅडम,अॅड सर्फराज सय्यद सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी बार आणि बेंच रिलेशन मजबूत करण्यावर भर दिला जाईल, पक्षकारांसाठी आसन व्यवस्था, पिण्याची पाणी व्यवस्था आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देणार असल्याचे मुख्य न्यायाधीश एस ए मुळीक यांनी सांगितले. कार्यकारिणीचे अध्यक्ष विठ्ठल पिंपळे यांनी याकामी आवश्यक ते सहकार्य वडगाव मावळ लीगल असोसिएशनच्या वतीने करण्यात येईल असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.