Vadgaon Maval : वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव यांच्या वतीने आज कायदेविषयक शिबिर

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव मावळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शनिवार सकाळी 10 वाजता वडगाव मावळ नगरपंचायत कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात राष्ट्रीय विधीसेवा समितीच्या विविध योजना, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा – 2005, माहिती व तंत्रज्ञान कायदा (सायबर गुन्हे – जनजागृती) या विषयावर वडगाव मावळ न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. बुरांडे, वडगाव मावळ बार असोसिएशनचे सभासद अॅड. वैशाली साबळे तसेच अॅड.  अमोल दाभाडे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढ़ोरे, वडगाव मावळ नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले उपस्थित राहणार आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.