Vadgaon Maval : वडगावकरांच्या सेवेत फक्कड वहिले चहा

वहिले चहा दालनाचे उदघाटन

एमपीसी न्यूज- वडगावकरांना आता फक्कड चहाचा आस्वाद घेता येणार आहे. वडगाव (मावळ ) येथील खंडोबा चौकात नव्याने सुरु झालेल्या वहिले चहा व स्नॅक्स या दालनाचे उदघाटन आज, शनिवारी वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर भेगडे आणि जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांच्या हस्ते झाले.

स्पेशल निखारा मिसळ व कोल्हापुरी कट वडा, इडली सांबार, वडा सांबार, वडा पाव, पॅटिस भेळ आणि फक्कड चहा ही या दालनाची खासियत आहे.  या दालनाची सजावट शिवकालीन पद्धतीची असून येथे भेट देणाऱ्या ग्राहकांना वेगळ्या वातावरणात गेल्याचा आनंद मिळतो. येथील खाद्यपदार्थाचे दर देखील सर्वसामान्यांना परवडणारे आहेत.

उदघाटनप्रसंगी शेखर भोसले, राजेंद्र कुडे, सुभाषराव जाधव, मंगेश ढोरे,पोपटराव वहिले, तुकाराम ढोरे, सचिन भेगडे,आफताब सय्यद, मंगेश खैरे, अतुल राऊत, प्रमोद वहिले, सुधीर वहिले आदी उपस्थित होते. ग्राहकांना समाधानकारक सेवा देणार असल्याचे संचालक तुषार वहिले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.