BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : वसुबारस निमित्त 200 महिलांनी केले गोवत्स पूजन

182
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- वसुबारस निमित्त ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात नगरसेवक प्रवीण उर्फ राजू चव्हाण यांच्या पुढाकाराने गोवत्स पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात 200 महिलांनी सहभाग घेतला.

भारतीय संस्कृतीमध्ये गायीला असलेले महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस पारंपरिक पध्दतीने साजरा केला गेला. या दिवशी पारंपरिक पोशाखात महिला भगिनींनी गे वासराची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. संस्कृती जतन होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सदैव झाले पाहिजेत असे मत नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी व्यक्त करत प्रतिवर्षी हा गो पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल असे सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन किरण लवाटे , सुनील चांदेकर ,केदार बवरे,अतुल राऊत, भूषण मुथा, आदित्य महांगरे, अवधूत महांगरे आदींनी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.