_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : वसुबारस निमित्त आयोजित गोवत्स पूजन कार्यक्रमाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- वसुबारस निमित्त वडगांव येथील नगरसेवक प्रवीण उर्फ राजू चव्हाण यांच्या सहकार्याने श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिरालगत गाय वासरू पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमारे 150 महिला भगिनी आणि नागरिकांनी गोवत्स पूजनाचा लाभ घेतला व गायीस नैवेद्य अर्पण केला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

सायंकाळी झालेल्या या संस्कृती जतनाच्या कार्यक्रमाला शांताराम कुटे, अतुल राऊत, भूषण मुथा, आनंदा पडवळ, विजय बवरे, प्रभाकर जोशी, सुरेश गुरव, चेतन सावळे, केदार बवरे, सुमेध म्हाळसकर, प्रथमेश घाग, मयूर भोयटे आदी उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.