Vadgaon Maval : विशाल वहिले यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ ग्रुपग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विशाल वसंतराव वहिले यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, ज्येष्ठ नेते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, जि प सदस्य बाबुराव वायकर, युवक अध्यक्ष सुनील दाभाडे याच्या उपस्थितीत आज जाहीर निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने तरूण वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

युवक कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम आगामी काळात केले जाईल. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असे यावेळी वहिले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.