Vadgaon Maval : विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्ता नाटक

उपाध्यक्षपदी प्रकाश लोणकर

एमपीसी न्यूज- पै. विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दत्ता नाटक तर उपाध्यक्षपदी प्रकाश लोणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, वडगाव मावळ कार्यालयाचे सहकारी सहाय्यक अधिकारी व्ही पी कोतकर यांनी काम पहिले. त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या सचिवपदी मंगेश सरोदे व खजिनदारपदी संदीप शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

पतसंस्थेकडे 1 कोटी 8 लाख रुपयांचे वसूल भागभांडवल असून 1 कोटी 77 लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. 9 कोटी 57 लाख रुपयांचे कर्जवाटप केले असून 2 कोटी 28 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. खेळते भांडवल 15 कोटी 12 लाख रुपये असून सभासद संख्या 2869 आहे. गेली 11 वर्षे अ ऑडिटवर्ग मिळाला असून तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था असल्याची ओळख आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.