Vadgaon Maval: साते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोहितेवाडीचे विठ्ठल भगवान मोहिते यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – साते ग्रामपंचायतीचे याआधीचे सरपंच सुरेश आगळमे यांनी कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी विशेष सभा होऊन निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विठ्ठल भगवान मोहिते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद खोमणे यांनी जाहीर केले.

यावेळी उपसरपंच वैशाली आनंदे, माजी सरपंच संदीप आगळमे, सुरेश आगळमे, विद्या मोहिते, कविता विनोदे, अपर्णा शिंदे, साहेबराव गायकवाड, भारती आगळमे, संध्याताई शेळके आदी सदस्य उपस्थित होते. साते ग्रामपंचायतीमध्ये साते, मोहितेवाडी, ब्राह्मणवाडी, विनोदेवाडी या गावांचा समावेश आहे.

याआधी उपसरपंचपदाची संधी या गावाला मिळालेली होती. पण, सरपंचपदाने आतापर्यंत या गावाला हुलकावणी दिली होती. पण, विठ्ठल मोहिते यांच्या रूपाने मोहितेवाडीला 35 वर्षांनी सरपंचपदाची संधी मिळालेली आहे. त्यामुळे मोठा आनंदोत्सव साजरा केला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, सुदाम आगळमे, माजी उपसरपंच अनिल मोहिते, दशरथ आगळमे, रमेश गावडे, बाळासाहेब मिडगुले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरपंच मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविणार आहे. तसेच प्लॅस्टिकमुक्त गाव करून सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्नशील राहणार असल्याचे मोहिते यांनी निवडीनंतर सांगितले.

सरपंच विठ्ठल भगवान मोहिते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.