Vadgaon Maval : व्हाट्स अपवर धमकीचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी वाद; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – व्हाट्स अपवर धमकीचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी विचारणा करणा-या दोघांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28) सकाळी दहाच्या सुमारास मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

ऋतिक बाळू असवले (वय 19, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या व्हाट्स अपवर दमदाटी आणि धमकीचे 27 जानेवारी रोजी स्टेटस ठेवले. त्याबाबत फिर्यादी ऋतिक आणि त्यांचा चुलत भाऊ 28 जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास आरोपीला विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी आणि त्यांच्या चुलत भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत दगडाने नाकावर आणि तोंडावर मारून गंभीर दुखापत केली. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.