Vadgaon Maval: वडगावात जागतिक रक्तदान दिनानिमित्त रविवारी शिबिर

Vadgaon Maval: World Blood Donation Day Camp at vadgaon या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास एक मेडिकल किट देण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- जागतिक रक्तदान दिनानिमित्त येथील बालविकास मित्र मंडळाकडून रविवार (दि.14) वडगाव मावळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अतुल राऊत यांनी दिली.

जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून बालविकास मित्र मंडळ, वडगाव मावळ आयोजित “रक्तदान शिबिर” रविवार दि 14 जून 2020 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वा पर्यंत स्थळ- श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिराशेजारी, आनंदसागर बिल्डिंग पार्किंग, वडगाव मावळ येथे आयोजित केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास एक मेडिकल किट देण्यात येणार आहे. रक्तदाता दर 3 महिन्यांनी रक्तदान करु शकतो, आपण दिलेले रक्त 24 तासांत पुन्हा आपल्या शरीरात तयार होते, रक्तदात्यास रक्ताची आवश्यकता पडल्यास मोफत रक्त पुरवठा होऊ शकेल. महिलांसाठी रक्तदानाची वेगळी सोय करण्यात आली आहे.

कोरोनाच्या या संकटात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सर्वांना रक्तदान करण्याचे आवाहन बालविकास मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल राऊत व संयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी 9822042484 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1