Vadgaon Maval: श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या वतीने प्रभू श्री राम यांचे प्रतिमेचे पूजन

एमपीसी न्यूज – अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते संपन्न होत असताना मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान श्री ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर या ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे व माजी आमदार दिगंबर भेगडे तसेच मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती घेण्यात आली तसेच प्रभू रामचंद्रांचा जय घोष करण्यात आला. उपस्थितांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला.

यावेळी हभप अखिल भारतीय वारकरी संप्रदाय मावळचे अध्यक्ष दत्ता महाराज शिंदे, हभप अर्जुन फलके, हभप सुखदेव ठाकर, हभप गणेश जांभळे, मावळ भाजपचे प्रभारी भास्कराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, कुंभार समाजाचे जिल्हा अध्यक्ष संतोष कुंभार, देवस्थानचे उपाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे,  विश्वस्त सचिव अनंता कुडे, सह सचिव किरण भिलारे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त अ‍ॅड. अशोक ढमाले, अ‍ॅड. तुकाराम काटे, विश्वस्त अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, सुनीता कुडे आदीसह पुजारी मयुर गुरव व पुरोहित सुशीलकुमार भिडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.