_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : युवा शेतकरी मुकुंद ठाकर यांचा कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरव

एमपीसी न्यूज- येळसे येथील युवा शेतकरी मुकुंद ठाकर यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकरी बांधवांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये येळसे येथील शेतकरी मुकुंद ठाकर यांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

ठाकर यांनी पारंपरिक भातशेतीला पूरक व्यवसाय म्हणून एक एकरावर फुलशेती प्रयोग राबविला यामध्ये यशस्वी झाल्यानंतर पवना फूल उत्पादक संघाची स्थापना करून सर्वांना एकत्र करत सामूहिक 40 एकर क्षेत्रावर ग्रीन हाऊस फुलशेती करुन विक्रमी उत्पादन घेत सर्व माल परदेशात निर्यात केला. याची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते मुकुंद ठाकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, गणेश धानिवले,येळसेचे सरपंच शिवाजी सुतार, तानाजी शेडगे,दत्तात्रय ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, दत्तात्रय लायगुडे, विष्णू पवार, पंडीत शिकार, नवनाथ ठाकर, भारत काळे, प्रसाद भेगडे, तुकाराम दळवी, रामदास पवार, तुकाराम निंबळे, श्रीराम कुर्‍हे, आदित्य देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.