Vadgaon Maval: टाकवे येथील रक्तदान शिबिरास युवकांचा प्रतिसाद

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क वापरणे, एका ठिकाणी गर्दी न करणे, सॅनिटायझर लावणे या सर्व नियमांचे पालन करीत रक्तदान शिबिर झाले.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे टाकवे बुद्रुक येथील स्व. संकेत असवले युवा प्रतिष्ठानच्या वतीने येथील भैरवनाथ मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 62 जणांनी रक्तदान करुन शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.

राज्यातील रक्त पेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी असल्याने महाराष्ट्र सरकारच्या वतीने रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याला स्व. संकेत असवले युवा प्रतिष्ठानने प्रतिसाद दिला. शनिवारी (दि. 1) संकेत असवले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क वापरणे, एका ठिकाणी गर्दी न करणे, सॅनिटायझर लावणे या सर्व नियमांचे पालन करीत रक्तदान शिबिर झाले.

रक्तदान शिबिरात युवकांनी भरपूर प्रतिसाद दिला. एकूण 62 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. अथर्व ब्लड सेंटर, तळेगाव दाभाडे यांचे रक्तदान शिबिरास विशेष सहकार्य लाभले. स्व. संकेत असवले युवा प्रतिष्ठानच्या सभासदांनी शिबीर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.