Vadgaon : आमदार शेळके यांच्यावतीने वडगाव नगरपंचायतीस वैद्यकीय साहित्य भेट

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायतीस ‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रम’ अंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात अत्यावश्यक असलेल्या पीपीई कीट, एन 95 मास्क, थर्मल गन, सॅनिटायझर, ट्रीपल लेअर मास्क, सोडिअम हायपोक्लोराइड लिक्विड आदी वैद्यकीय साहित्याचे वाटप आज ( बुधवारी ) नगरपंचायत येथे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके एक कुटुंब प्रमुख म्हणून उत्तमरित्या कार्य करत आहेत. त्यानुसार त्यांनी वडगाव नगरपंचायतीला सर्व वैद्यकीय साधनसामग्री व साहित्य दिले आहे.

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, ज्येष्ठ नेते सुनिल चव्हाण, चंद्रकांत ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष आफताब सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल वहिले, युवा नेते शरद ढोरे यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, उपनगराध्यक्ष माया चव्हाण, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, पुजा वहिले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.