Vadgaon News : ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला; सुदैवाने जीवितहानी नाही

0

एमपीसीन्यूज : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यालगत उलटला. सुदैवाने या अपघातात ट्रॅक्टर चालक बचावला आहे. ही घटना शनिवारी (दि.20) दुपारी साडेचारच्या सुमारास पुणे-मुंबई  महामार्गावर वडगाव (ता. मावळ) हद्दीत घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात झालेलया ट्रॅक्टरमध्ये (एमएच 14 बीएम 2444) ऊस वाहतूक केली जात होती.

_MPC_DIR_MPU_II

हा ट्रॅक्टर कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात निघाला होता. पुणे-मुंबई  महामार्गावर वडगाव (ता. मावळ) हद्दीत ट्रॅक्टरचा डाव्या बाजूचा टायर फुटला. त्यामुळे ट्रॅक्टर महामार्गाच्या डाव्या बाजूला उलटला.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. तर या अपघातामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले.

कारखान्याची ऊस वाहतूक धोकादायक पद्धतीने केली जात असल्याचे या घटनेवरून दिसून येते. दरवर्षी ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर उलटण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे ऊस वाहतूक सुरक्षित करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like
Leave a comment