Vadgaon News : इंद्रायणी नदीकाठी पोहायला गेलेल्या युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीकाठी पोहायला गेलेल्या युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (दि.17) दुपारी 3 वा. वारंगवाडी ता. मावळ येथे घडली.

याघटनेची खबर गिरीश सावले यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दिली. तुषार कैलास आहेर (वय 21, रा. केळगाव आळंदी ता खेड जि पुणे) असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार खबर देणार यांची वहिनी जयश्री सोमनाथ सावले मुलगी संस्कृती, साक्षी व भाचा तुषार हे इंद्रायणी नदीचे काठावर फिरण्यासाठी गेले होते. तुषार आहेर हा पोहत असताना अचानक बुडाला. मासेमारी करणारा सुनील सुपेकर याने तुषार याला पाण्यातून बाहेर काढले पण त्याचा श्वासोच्छ्वास बंद झाला होता. त्याचा मृत्यू झाला.

या गुन्ह्याचा तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.