Vadgaon News : लाच प्रकरणी आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज –  न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा जामीन करण्यासाठी 5 लाखाच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला जिल्हा विशेष न्यायालयाने बुधवारी (दि.10) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नेवाळे यांचा जामीन करण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कामशेत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम व कर्मचारी महेश दौंडकर यांना शनिवारी (दि.6) दुपारी 3:25 वा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पथकाने रोख एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

रविवारी (दि.7) जिल्हा विशेष न्यायालयाने या आरोपींना बुधवार (दि.10) पर्यंत पोलीस कोठडी दिली त्या कोठडीची मुदत संपल्याने पोलीस निरीक्षक अलका सरग, सुनील क्षीरसागर, सुनील भिले, कर्मचारी वैभव गिरीगोसावी, रतेश थरकर, किरण चिमटे या पथकाने पुन्हा बुधवारी (दि.10) जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले असता, आरोपींना गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली. येरवडा (पुणे) कारागृहात रवानगी करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.