Vadgaon News : न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदर मावळातील सहारा वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तू व बेडचे वाटप

एमपीसी न्यूज – वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 1988 मधील दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदर मावळातील सहारा वृद्धाश्रमास बेड तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

कुसवली येथील अनाथ व निराधारांसाठी असलेल्या वृद्धाश्रमातील आवश्यक गरजांची माहिती घेऊन सामाजिक क्षेत्रात व गरजूंसाठी विविध स्वरूपाचे कार्य करणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांनी वस्तू येथे प्रदान केल्या.

पाच बेड, पाच पंखे, किराणा सामान तसेच स्टेशनरी व कटलरी वस्तू , कपडे, धान्य अशा वस्तूंनी भरलेला टेम्पो घेऊन वृद्धाश्रमाच्या संयोजकांच्या ताब्यात या वस्तू सुपूर्द केल्या.

सध्याच्या कोरोना संकटामुळे माणूस माणसाला पारखा झाल्याची स्थिती असताना जग संकटात सापडले आहे. अशाही स्थितीत काही चांगल्या संस्था या सेवाभावी कार्य करत असल्याने सामाजिक उत्तरदायित्व महत्त्वाचे असल्याने या माजी विद्यार्थ्यांनी जाणले व मदतीचे दान दिले. या कार्यक्रमात ग्रुप मधील संजय कोकरे, कैलास पगडे, सुधाकर भोसले, एकनाथ गाडे, प्रमोद वहिले, अजय जाधव, जॉनी मकासरे, प्रमोद म्हालसकर, ज्ञानेश्वर नखाते, संतोष खामकर, मंगेश बवरे, सोपान खांदवे, सलीम तांबोळी उपस्थित होते.

सहारा वृध्दाश्रमाचे विजय जगताप यांनी लिहिलेली तीन पुस्तके त्यांनी उपस्थितांना भेट दिली. प्रबोधनकार शारदा मुंडे, रामेश्वर राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.