Vadgaon News: श्री पोटोबा देवस्थानचा वार्षिक अहवाल धर्मदाय आयुक्तांना सादर

एमपीसी न्यूज –  मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा देवस्थानचा दहावा वार्षिक कार्यपूर्ती अहवाल पुणे येथील धर्मदाय आयुक्तालय या ठिकाणी सादर करण्यात आला. 

यावेळी सह धर्मदाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी सदर अहवाल संस्थानच्या विश्वस्त मंडळींकडून स्वीकारला. अहवाल पुस्तिका पाहून देवस्थानच्या कार्याचे कौतुक देखील जगताप यांनी केले तसेच पुढील भविष्य काळासाठी  देवस्थानच्या सर्व कार्याला लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे,  कायदेशीर सल्लागार ॲड तुकाराम काटे, विश्वस्त सहसचिव किरण भिलारे, क्लार्क संभाजी येवले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.