Vadgaon News: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल सोशल मिडिया प्रभारीपदी मावळचे अतुल राऊत
एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल चंद्रकांत राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल सोशल मीडिया प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर केली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.
अतुल राऊत यांचा राजकीय, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सहकार आधी क्षेत्रांशी अत्यंत मोठा सहभाग आहे. राऊत हे स्मित कला रंजन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून मावळ सोशल फाऊंडेशनचे ते उपाध्यक्ष तर डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
स्वर्गीय पै केशवराव ढोरे प्रतिष्ठान ( सामुदायिक विवाह सोहळा) ते संचालक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यात त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना अहवाल सादर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रभारी, निरिक्षक यांनी महाराष्ट्रभर दौरा करून आज त्या सर्व जिल्ह्यातील आढावा अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिला. चांगले काम केल्याचे सर्व समक्ष बोलून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कौतुक केले.
यावेळी कोकण प्रभारी राज राजापूरकर, सलीम बेग, उत्तर महाराष्ट्र प्रभारी उमेश नेमाडे, निरिक्षक सचिन औटे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी लतीफ तांबोळी, निरिक्षक सतीश दरेकर, विदर्भ प्रभारी डाॅ विलास मूर्ती, राजू गुल्हाने, मराठवाडा प्रदेश डाॅ. शिवाजी राऊत, संतोष भाकरे, निरीक्षक नानासाहेब राऊत, श्रीनिवास अकनगीरे, सोशल मिडिया प्रभारी अतुल राऊत, मावळ तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष आफताब सय्यद यांनी विभागनिहाय अहवाल सादर केला.