Vadgaon News : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपच्या प्रसाद पिंगळे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे प्रसाद अरविंद पिगंळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

माजी स्वीकृत नगरसेवक शाम ढोरे यांनी महिणन्यापुर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. महिन्यापूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता परंतु भाजपचे प्रसाद पिंगळे याचे नामनिर्देशन पत्र अवैध झाल्याने निवडणुक स्थगित करण्यात आली होती.

आज या पदासाठी पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष मयुर ढोरे याच्या अध्यक्षतेखाली निवडणुक घेण्यात आली भाजपचे प्रसाद पिंगळे यांचा अर्ज वैध झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मयुर ढोरे यांनी जाहीर केले.

यावेळी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, उपनगराध्यक्षा प्रमिला बाफणा, आघाडीचे नगरसेवक गटनेते राजेंद्र कुडे, चंद्रजित वाघमारे, माया चव्हाण, राहूल ढोरे, पुजा वहिले, पुनम जाधव, सायली म्हाळसकर, शारदा ढोरे, सुनील ढोरे तर भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, दशरथ खेंगले आदी नगरसेवक उपस्थित होते.

निवडीनतंर भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती निवृत्ती शेटे , तालुका सरचिटणिस सुनिल चव्हाण, माजी अध्यक्ष नारायण ढोरे , अ‍ॅड. तुकाराम काटे, शहराध्यक्ष किरण भिलारे, सोशल मीडिया अध्यक्ष अनंता कुडे, रविंद्र काकडे, महिलाध्यक्षा धनश्री भोंडवे, रमेश ढोरे, सुधाकर ढोरे, खंडु भिलारे आदींनी त्यांचे अभिनदंन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.