Sharad Pawar Birthday News : वडगावात 53 जणांचे रक्तदान, शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिरात ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसीन्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी सेल, अल्पसंख्यांक सेल, वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रोहितदादा पवार फॅन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरामध्ये 53दात्यांनी रक्तदान केले. तर मोफत एकदिवसीय शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिरास 85  विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग.

ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबूराव वायकर, माजी पं. स. सभापती विठ्ठलराव शिंदे, तालुका ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते मंगेश ढोरे, वि.म. शिंदे, उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, नगरसेवक राहुल ढोरे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, नितीन भांबळ, बंडोपंत भेगडे, पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, विजय सुराणा, महिला तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत, ओबीसी सेल अध्यक्षा सुरेखा गाडे, नगरसेविका माया चव्हाण, पूजा वहिले, ज्योती जाधव, सुनिल शिंदे, बाळासाहेब शिंदे, विवेक गुरव सर, गंगाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, पंढरीनाथ ढोरे,राजु बाफना, शांताराम कुडे, सुरेश कुडे, लक्ष्मण ढोरे, काशिनाथ भालेराव, सिद्धेश्वर झरेकर, सुरेश गुरव, विवेक कुलकर्णी, प्रवीण ढोरे, गणेश पं. ढोरे, अजित वहिले, शंकर साकोरे, संजय लोणकर, शेखर वाघमारे, मयूर वाघमारे, विनायक लवंगारे,अक्षय रौंधळ, आकाश चिवटे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

या स्तुत्य उपक्रमास पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्थ सोपानराव म्हाळसकर यांनी शुभेच्छा दिल्या व या कोरोना महामारीत जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून पुण्यकर्म करावे, असे आवाहन केले.

गरवारे रक्त संकलन केंद्र, तळेगाव दाभाडे येथील राहुल पारगे व सर्व डॉक्टर्स टीम यांचे रक्तदान शिबिरास तर एकदिवसीय शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिरास प्रशिक्षक किरण अडागळे, संजय बनसोडे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादीचे वडगाव शहराध्यक्ष, नगरसेवक राजेंद्र कुडे, मावळ ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, प्रभारी मंगेश खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, पुणे जिल्हा युवक सरचिटणीस विशाल वहिले, मावळ अल्पसंख्यांक अध्यक्ष आफताब सय्यद, ओबीसी सेल शहराध्यक्ष मयूर गुरव, युवक शहराध्यक्ष भाऊ ढोरे, अवधूत गायकवाड, प्रथमेश घाग, राहील तांबोळी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.