Vadgaon News : पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी- मावळ काँग्रेसची मागणी

एमपीसीन्यूज : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकासह ऊस, झेंडू, भुईमुग, नाचणी, वरई या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

याबाबत मावळचे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, निखिल कवीश्वर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, विलास मालपोटे, गणेश काजळे, महादू खांदवे, माऊली जांभूळकर, उतम ओसवाल, महेश मालपोटे, रोहिदास वाळूंज, नंदू हुलावळे, जितू खळदे, गोरख ढोरे, सुनील कोद्रे, राहुल गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, असलम शेख, शंकर वाघमारे, सतीश ढोरे, एकनाथ येवले, विलास विकारी, सिद्धेश ढोरे, यशवंत शिंदे, सुधीर भोंगाडे, शांताराम लष्करी, शांताराम नरवडे, आनंता लायगुडे, भरत दळवी, बाळासाहेब वायकर, बसवेल उमाळे, विशाल उमाळे, जितेंद्र खळदे, अशोक चव्हाण, साधू आरडे, दामोदर मराठे व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकरी हा संपूर्णपणे भात पिकावर अवलंबून असतो. देशावर असणा-या कोविड-१९ या आजारामुळे मावळ तालुक्यातील संपूर्ण व्यवसाय बंद असल्यामुळे उपजीविकेचे साधन हे शेती आहे. याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही.

शेती पिकांच्या नुकसानीमुळे मावळ तालुक्यातील शेतकरी हतबल झालेला आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत विम्याच्या रकमा शेतकऱ्यांकडून वर्ग करून घेतलेल्या आहेत.

त्यामुळे सर्व शासकीय अधिकाऱ्यांमार्फत सरसकट पंचनामे करून विमा कंपन्यांना नुकसान
भरपाई करण्याबाबतच्या सूचना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.