Vadgaon News : कोविड सेंटरमध्ये महिलांकरिता स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करा- भाजप महिला मोर्चाची मागणी

सुरक्षितेकरिता महिला पोलीस स्टाफची नेमणूक करावी

एमपीसीन्यूज : कोविड सेंटरमध्ये महिलांकरिता स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करून तेथील सुरक्षितेकरिता महिला पोलीस स्टाफची नेमणूक करावी, अशी मागणी भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने मावळच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे वडगाव मावळ व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर वडगाव मावळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यातच कोविड केअर सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकूणच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्या अनुषंगाने कोविड केअर सेंटरमध्ये स्वतंत्र महिला वाॅर्ड निर्माण करण्याचे आदेश देऊन अंमलबजावणीकरण्यात यावी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला स्टाफ नेमण्यात यावा.

यावेळी  भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्षा सायली बोत्रे, सभापती निकीता घोटकुले, प्रदेश उपाध्यक्षा ज्योती जाधव, प्रदेश सदस्या कोमल काळभोर,  कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव,   जिल्हा सरचिटणीस श्रिया राहाळकर, मावळ भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी,   वैशाली ढोरे, अनिता सावले,  कल्यानी ठाकर, उपाध्यक्ष शोभा भेगडे, नाणे मावळ अध्यक्ष सीमा आहेर, पवन मावळ कार्याध्यक्ष रचना विधाटे, तळेगाव महिला अध्यक्षा अंजली जोगळेकर आदी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.