Vadgaon Maval News : शांताबाई शंकरराव आगळमे यांचे निधन

एम​पीसी न्यूज – साते (मावळ) येथील शेतकरी कुटुंबातील व वारकरी  संप्रदायातील, आदर्श माता पुरस्कार प्राप्त श्रीमती शांताबाई शंकरराव आगळमे (वय 65 ) यांचे शनिवार (दि 8) रोजी सायं. 4 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, तीन दीर, पुतणे व पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

साते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश आगळमे, गुणवंत कामगार दीपक आगळमे व माजी सरपंच संदीप आगळमे यांच्या त्या मातोश्री होत तर कार्ला ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाळासाहेब हुलावळे यांच्या त्या भगिनी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.