Vadgaon News: कोविड समर्पित मावळ हॉस्पिटलचे आमदार शेळके यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील मावळ हॉस्पिटल शनिवारपासून समर्पित कोविड हॉस्पिटल (DCHC) म्हणून लोकार्पण करण्यात आले.

हे हॉस्पिटल 50 बेडचे असून, यात 16 आयसीयू बेड, (4 व्हेंटिलेटर, 12 बायपाइप), 18 नाॅर्मल ऑक्सिजन बेड, 16 आइसोलेशन बेड, फुल टाइम चेस्ट फिजिशियन (श्वसनरोग तज्ञ), फूल टाइम आय.सी. यू इंटेंसिविस्ट (डॉक्टर्स), वेल ट्रेनेड नर्सिंग स्टाफ, एक्स-रे, कोरोना स्वॅब टेस्ट, आधुनिक पैथोलाॅजी (रक्त,लघवी तपासणी) लैब, पेशंटला नाश्ता व जेवण, पोस्ट कोविड ओपीडी या सर्व सुविधानी युक्त, सुसज्ज कोविड़ क्रिटिकल केअर सेंटर आहे.

डॉ. पार्थ शिंदे, डॉ. अंजली शिंदे, डॉ. स्वप्नाली शिंदे, डॉ. नोवा शिंदे या कुटुंबीयांच्या वतीने  दिवंगत डॉक्टर लक्ष्मीकांत शिंदे सर व नुकतेच कोरोनाशी झुंज देताना स्वर्गवासी झालेले डॉ. दिलीप भोगे यांच्या स्मृतींस हे रुग्णालय समर्पित करण्यात आले आहे.

यावेळी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते व  काँग्रेस आय तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, अनिकेत घुले, अतुल राऊत, डॉ. गणपत जाधव (मेडिकल सुप्रिटेंडेंट), डॉ.गुणेश बागडे (मावळ तालुका कोविड़ समन्वयक), डॉ. संजय गभाले (श्वसन रोगतज्ज्ञ), डॉ. अशोक प्रजापती, डॉ.प्रमोद मौर्य, डॉ. सुनील बाफना, डॉ.दिनेश दाते, डॉ.अक्षय काटे व मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थित मावळ कोरोना हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.