Vadgaon News : गौतम हिरण आणि मनसुख हिरेन यांच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – बेलापूर (अहमदनगर) येथील व्यापारी स्व. गौतम हिरण यांच्या 1 मार्च रोजी त्यांच्या दुकानजवळून झालेल्या अपहरण आणि त्यानंतर झालेली निर्घृण हत्या तसेच मुंबई येथील व्यापारी स्व.मनसुख हिरेन यांच्या गूढ मृत्यूमुळे जैन समाज आणि संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये तीव्र आक्रोश आणि संतापाची भावना निर्माण झालेली आहे. या खुनाचा तपास करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी असे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज देण्यात आले आहे.

वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार रावसाहेब चाटे साहेब यांना वडगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी वडगाव भाजप शहराध्यक्ष किरण भिलारे , नगरसेवक अॅड.विजय जाधव, नगरसेवक प्रसाद पिंगळे , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा, युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष विकी म्हाळसकर , उपाध्यक्ष मनोज बाफना, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस योगेश म्हाळसकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.