Vadgaon News : वडगाव मावळ नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9 मध्ये 55 लक्ष रुपयांच्या विकासकामांची सुरुवात – नगरसेवक प्रवीण चव्हाण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 9 मध्ये 55 लक्ष रुपयांच्या विकासकामांची सुरुवात करण्यात आली.

आज चावडी चौक ते रामचंद्र गुरव यांच्या निवासस्थानापर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे आणि आर सी सी पाईप बंदिस्त गटर योजना या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले

यावेळी ज्येष्ठ नेते अरविंद पिंगळे, सदानंद बवरे, माजी ग्रामपंचायत सदस्या मेधा बवरे, वडगाव भाजप शहराध्यक्ष किरण भिलारे, गटनेते दिनेश ढोरे, नारायण ढोरे, दिपक बवरे, सरपंच संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष विकी म्हाळसकर, बाळासाहेब चव्हाण, वसंतराव भिलारे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भालेकर  मोरेश्वर पोफळे, अमोल पगडे, समीर गुरव, विनायक भेगडे, महेंद्र म्हाळसकर, अमोल बवरे, प्रदीप बवरे, शैलेश ढोरे, अजित मुथा, अमोल मुथा, कंत्राटदार आदित्य पाळेकर आदींसह स्थानिक नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी या योजनेची माहिती देत यापुढेही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांचेही या विकासकामांसाठी सहकार्य लाभल्याचे सांगितले

प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे यांनी केले, सूत्रसंचालन व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा यांनी तर आभार प्रदर्शन मावळ तालुका भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी केले.

या पूर्वी प्रभाग क्रमांक 9 मध्ये चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर प्रवेशद्वार व परिसर ते बाळासाहेब कदम निवासस्थानापर्यंत बंदिस्त गटर आणि डांबरी रस्ता बँक ऑफ महाराष्ट्र भैरवनाथ दत्तनगरी प्रवेशद्वार ते सुधीर जानभोर यांच्या निवासस्थानापर्यंत पेव्हर ब्लॉक आणि बंदिस्त गटर योजना चावडी चौक तलाठी कार्यालयालगत महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह श्रीदत्त मंदिर परिसरालगत महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह या मुख्य विकासकामांची सुरुवात करण्यात आली असल्याची तसेच काही विकासकामे पूर्ण झाल्याची माहिती नगरसेवक प्रवीण चव्हाण यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.