Vadgaon News : ‘शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांची आर्थिक लुटमार थांबवावी’

ग्राहक पंचायत, श्री पोटोबा महाराज देवस्थान व पालक वर्गाची मागणी

एमपीसीन्यूज : कोवीड 19 मुळे जागतिक मंदी निर्माण झाली आहे. अशा काळातही शैक्षाणिक संस्थांनी प्रवेशाच्या वेळी पालकांसह विद्यार्थ्यांची विकास निधीच्या नावाखाली आर्थिक लुटमार चालविली आहे. ती तातडीने थांबवावी; अन्यथा संबंधित संस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्राहक पंचायतचे प्रदेश सचिव अरूण वाघमारे, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे सचिव अनंता कुडे व पालक वर्गाकडून करण्यात आली आहे.

याबाबत मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की मावळ तालुक्यात खाजगी शिक्षण संस्थांद्वारे विद्यार्थी व पालकांची आर्थिक लुटमार चालविली आहे.

शिक्षण संस्था विकास निधीच्या गोंडस नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून रोख रक्कम उकळत आहेत. हे बेकायदेशिर असून, अशा संस्था चालकांविरूद्ध योग्य ती शासनांच्या कार्यप्रणालीनुसार कारवाई करावी.

ज्या ज्या संस्थांनी विकास निधीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून फि वसूल केली आहे, ती संबंधितांना परत देण्यात यावी.

तसेच इयत्ता 10 वीचे दाखले काढतांना देखील 100 रुपयापासून 300 रुपयापर्यंतची रक्कम शैक्षणिक संस्था वसूल करत आहेत. अशांवरही तातडीने कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर ग्राहक पंचायतचे राज्य सचिव अरूण वाघमारे, पोटोबा देवस्थानचे सचिव अनंता कुडे व पालकांतर्फे हर्षद चंद्रकांत ढोरे,अमृतलाल पुनमिया, सोमनाथ भोसले, मनोहर येवले, रूपेश दौंडे, समिर ओव्हाळ,रवी म्हाळसकर, संदीप वाघवले, मिना वाघवले, ज्योती वाघवले, धनेश वाघवले, सागर ढोरे,दिपक येवले, भाग्यश्री जाधव,आनंद मोरे, सचिन म्हाळसकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.