Vadgaon News : एकवीरा विद्या मंदिर एक उपक्रमशील शाळा ! – संतोष खांडगे

एमपीसी न्यूज – शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत हि शाळा राज्यात एक उपक्रमशील, आदर्श शाळा म्हणून ओळखली जाईल असा विश्वास नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.

कार्ला येथील श्री एकवीरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता काॅलेज ऑफ कॉमर्स या प्रशालेच्या नूतन उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी खांडगे बोलत होते.

शाळेच्या इमारत परिसरात नूतन उद्यानाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सीच्या अध्यक्षा रजनीगंधा संतोष खांडगे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. सोशल डिस्टन्सिंग व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे होते. यावेळी गुणवंत कामगार संदीप पानसरे, उद्योजक संभाजी केदारी, पर्यावरण मित्र ‌विवेक भगतसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

एकवीरा विद्या मंदिर हि शाळा इंग्रजी माध्यमाच्या ‌शाळांच्या तोडीची शाळा असून या शाळेचे भविष्य खूप उज्वल आहे असे प्रतिपादन रो. रजनीगंधा खांडगे यांनी केले.

पर्यावरण व माॅडेल स्कूल करण्याचा निर्धार शालेय समितीचे अध्यक्ष सोनबा गोपाळे यांनी व्यक्त केला.

उद्यानासाठी 500 कुंड्या व 500 फुलझाडे संदीप पानसरे यांनी प्रदान केली. नुकताच राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते संदीप पानसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नूतन उद्यानासाठी लागणारे खत देण्याचे संभाजी केदारी यांनी जाहीर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भगवान शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन उमेश इंगुळकर यांनी केले.

आभार अरूणा बुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.