Vadgaon News : आगामी निवडणुकांसाठी बूथ कमिट्याअधिकाधिक सक्षम करा : शैला मोळक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – “आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ कमिट्यांसाठी महिलांनी आतापासून कामाला लागावे. बूथ कमिट्या अधिकाधिक सक्षम कराव्यात. एका बूथमध्ये 10 महिला अशा प्रकारे बूथ कमिट्यांचे नियोजन करावे’, असा कानमंत्र भाजप महिला मोर्चा प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना दिला.

बूथ स्तरावर महिला संघटन मजबूत करण्यासाठी भाजप महिला आघाडीची बैठक वडगाव मावळ येथे पार पडली. त्यावेळी आत्मनिर्भर भारत, एक बूथ 10 वुमेन या विषयावर मार्गदर्शन करताना मोळक बोलत होत्या.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी संघटन वाढवून ते अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

तालुकाध्यक्षा सायली बोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीसाठी भाजप महिला मोर्चा प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच प्रदेश महिला मोर्चा कार्यकारणी सदस्या कोमल काळभोर, मावळ पंचायत समिती सभापती निकिता घोटकुले, लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सारिका संजय भेगडे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, डाॅ. उज्वला रविंद्र भेगडे, वडगावच्या माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, जिल्हा सरचिटणीस श्रेया रहाळकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या रजनी ठाकूर, विरांगणा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा नीलिमा दाभाडे, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सुरेखा जाधव म्हणाल्या, “ग्रामीण व शहरी भागामध्ये गरजू महिलांना केंद्र शासनाच्या योजनांची माहिती द्यावी. त्याचे लाभ मिळवून द्यावेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी तळागाळापर्यंत पक्षाचे काम पोहोचवावे. महिलांच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करावी.

सुमित्रा जाधव यांनी स्वागत केले. वैशाली ढोरे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती काटकर यांनी आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.