vadgaon News : जांभूळ येथे महिला ग्राम शाखेची स्थापना

एमपीसी न्यूज – नविन वर्षाचे औचित्य साधून नुकतीच अखिल भारतीय वारकरी मंडळाची पहिली महिला ग्राम समिती जांभुळ येथे स्थापन करण्यात आली. वारकरी मंडळाची हि राज्यातील पहिलीच महिला ग्राम समिती आहे.

धावत्या युगात भरकटलेल्या तरुणाईला संतांच्या विचारांची गरज असुन व्यसनमुक्त समाज घडविणे आणि संतांची शिकवण तळागाळात पोचविण्यासाठी वारकरी समाज संघटित होणे काळाची गरज आहे असे मत यावेळी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी पुणे जिल्ह्यासह मावळ तालुका, वडगाव नगरपंचायत समितीचे पदाधिकारी यांच्यासह तालुका आणि पंचक्रोशितील वारकरी व महिला मोठया प्रमाणावर हजर होत्या. उपस्थितांमध्ये विजय पवार, दत्ता कड, सोपान खराबी, सुखदेव ठाकर, भरत वरघडे, संतोष कुंभार, नारायण ढोरे, अनंता कुडे यांसह अनेक मान्यवर हजर होते.

यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारीणी पुढीलप्रमाणे –
सौ.अलका नवघणे – अध्यक्ष
सौ.अलका गराडे – उपाध्यक्ष
सौ.रंजना काकरे – सचिव
सौ.बेबी जांभुळकर – खजिनदार, नंदा जांभुळकर -सहखजिनदार, शकुंतला काकरे – संपर्कप्रमुख, शांताबाई काकरे – भजन समिती प्रमुख, बेबी गराडे – गोपालन समिती प्रमुख, मुक्ता जांभुळकर – आरोग्य समिती प्रमुख, सुरेखा काकरे – बालसंस्कार समिती प्रमुख, सिंधु जांभुळकर – वारकरी सेवा समिती प्रमुख, शोभा नवघणे – प्रासंगिक कार्य समिती प्रमुख, अलका काकरे – व्यसनमुक्ती समिती प्रमुख, मिरा जांभुळकर – युवती समिती प्रमुख, तर सदस्यपदी शांता जांभुळकर, द्रौपदा गायकवाड,लिला गराडे, सत्यभामा काकरे, शांता जांभुळकर, बेबी काकरे,मंदा गाडे, कांताबाई काकरे यांची निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.