Vadgaon News : लॉकडाऊन कालावधीसाठी वडगावात मोफत शिवराज थाळी

शिवराज ग्रुप व हाॅटेल शिवराज यांचा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

एमपीसीन्यूज : राज्य शासनाने लाॅकडाऊन सुरू केला असल्याने या कालावधीत हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांची व दीन दुबळयांची उपासमार होऊ नये, या उद्देशाने येथील शिवराज ग्रुप व हाॅटेल शिवराज यांच्यावतीने आज मंगळवार (दि 20) ते 1 मे पर्यंत मोफत शिवराज थाळी उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

हाॅटेल शिवराजचे मालक अतुल खंडू वायकर यांच्यावतीने सुरु केलेल्या या उपक्रमाचे खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे आदींच्या हस्ते मंगळवारी (दि.20) उद्घाटन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

याप्रसंगी उद्योजक सुधाकर शेळके, श्रीकांत वायकर, शरद हुलावळे, बंडोपंत निकम, सुनिल दंडेल, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, महेश नखाते व लाभार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाला वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी 11 हजार रुपये भेट देऊन अतुल वायकर यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक केले.

हाॅटेल शिवराजचे मालक  अतुल वायकर म्हणाले, कोरोनाचे एक वर्ष संपले. आता पुन्हा लॉक डाऊन सुरू झाल्याने ज्यांचे हातावर पोट आहे अशा सर्वसामान्य गरीब – गरजूंना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये. या साठी मोफत शिवराज थाळी सुरु करण्यात आली. हा उपक्रम दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. बुधवार व रविवार चिकन करी तर इतर दिवशी चपाती, भाजी, भात, वरण, लोणचे व एक बाॅईल अंडे तसेच पिण्याचे पाणी आदी सुविधा देण्यात येणार आहे. गरीब- गरजूंनी या थाळीचा लाभ घेण्याचे आवाहन वायकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.