Vadgaon News : क्रांती दिनानिमित्त उद्या वडगावमध्ये अभिवादन सभा !

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या क्रांती दिनानिमित्त वडगाव मावळ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

उद्या सोमवारी सकाळी 10:30 वा. 9ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हौतात्म्य पत्करलेल्या देशभक्त क्रांतीवीरांना अभिवादन, जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतीवीरांना अभिवादन तसेच 9 ऑगस्ट 2011 रोजी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेल्या आंदोलकांना अभिवादन करण्यासाठी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मदन बाफना व तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत अभिवादन सभा आयोजित केली आहे.

सर्वांनी अभिवादन सभेस उपस्थित राहावे, अशी विनंतीही तालुका अध्यक्ष भेगडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.