Vadgaon News : मावळ भाजपच्या वतीने वीजबिलांची होळी

एमपीसीन्यूज – गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी बंद होत्या. मात्र तरीही भरमसाठ विजेचे बिल कसे आले. ? वीज बिलात सवलती देऊ, शेतकऱ्यांना वीजबिल माफ करू, असे खोटे आश्वासन देणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात मावळ भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. येवले वीजबिलांची होळी करून सरकारचा निषेध करण्यात आलं.

यानंतर भारतीय जनता पार्टी मावळ तालुकाच्या वतीने तहसिलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी  माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,पंचायत समिती सभापती निकीता घोटकुले, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती गुलाब म्हाळस्कर, सरचिटनीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, संघटनमंत्री किरण राक्षे,नगरसेवक अरुण भेगडे, अभिमन्यू शिंदे,अनंता कुडे, सुभाष धामणकर, माजी अध्यक्ष नारायण ढोरे, नगरसेवक किरण म्हाळस्कर, संपत म्हाळस्कर, क्रीडा आघाडी नामदेव वारींगे, शत्रुघ्न धनवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना काळात लाखो वीज ग्राहकांना वाढीव बीले आली. लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली.

वाढीव वीज बील सुधारणा करून सामान्य जनतेला वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करूनही तिघाडी सरकारने सवलत देण्यापासून घुमजाव केले सामान्य जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत   मावळ भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वाखाली आज सोमवार (दि.  23) मावळ तहसील कार्यालय येथे वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.