Vadgaon News : महाराष्ट्र शासन कृषि विभाग अंतर्गत “विकेल ते पिकेल” अभियानाचे वडगांवमध्ये उद्घाटन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत वडगांव मावळ येथील श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर संत शिरोमणी रयत बाजाराचे उद्घाटन श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व कृषि अधिकारी विक्रम कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, किरण भिलारे, वडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर,माजी उपसरपंच विशाल वहिले, शेतकरी नंदकुमार दंडेल, भगवान पगडे, बबन भिलारे, विठ्ठल ढोरे, बाळासाहेब कुटे, किसन सुपे,शंकर चव्हाण, लक्ष्मण म्हाळसकर आदींसह अनेक शेतकरी व कृषी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर मनोगतामध्ये म्हणाले की, या बाजाराचे स्वरूप वडगांव पुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांसाठी संपूर्ण तालुकास्तरावर राबविन्यात यावे अशी सूचना म्हाळसकर यांनी कृषी अधिकारी विक्रम कुलकर्णी यांना केली.

कृषी अधिकारी विक्रम कुलकर्णी म्हणाले की विक्री होणारा शेतमाल,भाजीपाला हा स्थानिक शेकऱ्यांचा ताजा व स्वच्छ असल्याने नागरिकांनी प्रथम याच शेतकऱ्यांकडून खरेदी करावा, असे आवाहन त्यावेळी कुलकर्णी यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.