Vadgaon News: व्याख्याते विवेक गुरव समाजरत्न पुरस्काराचे मानकरी  

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गोविंद गुरव यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील खडकी (तुळजापूर) येथील अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवनात माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते व महिला बालकल्याण समिती पुणे अध्यक्षा माधुरी सहस्त्रबुद्धे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारीया, निवृत्त पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, मुख्य प्रशासन अधिकारी रमेश माने, संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम जवान यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यभर विविध विषयांवर व्याख्याने देऊन ते करत असलेली जनजागृती व ज्ञान विकास प्रबोधिनी सामाजिक संस्थेद्वारे देत असलेले व्यक्तीमत्त्व विकासाचे धडे या बाबींची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

विवेक गुरव यांनी ज्ञान विकास प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून भाषण कला शिकवून अनेक फर्डे वक्ते तयार केले असून स्वच्छ भारत अभियानातून आरोग्य विषयक जनजागृतीचे महत्त्वाचे कामही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.