Vadgaon News : मराठा आरक्षण टिकविण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी : बाळा भेगडे

एमपीसीन्यूज : निष्क्रिय सरकार मराठा समाजाला आरक्षण टिकून ठेवण्यात पुर्णपणेे अपयशी ठरले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थी व बेरोजगारांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील प्रश्नांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही, अशा शब्दात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडेल.

“सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवार (दि.14) दुपारी 12वाजता मावळ पंचायत समिती येथे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यानंतर मावळ तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी शिवाजी जाधव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवामोर्चा तालुकाध्यक्ष संदीप काकडे, भाजप महिला तालुकाध्यक्ष सायली बोत्रे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदींनी भाषणातून जाहीर निषेध केला.

याप्रसंगी सभापती निकिता घोटकुले, उपसभापती दत्ता शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, संघटनमंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, गणेश धानिवले, प्रशांत ढोरे, बाबूलाल गराडे, संतोष कुंभार, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, नितीन घोटकुले, नामदेव वारींगे, नामदेव शेडगे, सचिन भांडे, विकास लिंभोरे, देवा गायकवाड, रवींद्र विधाटे,  अनंता कुडे, दत्तात्रय गाडे, सागर शिंदे, वैशाली ढोरे, अमोल भेगडे, स्वामी गायकवाड, सुनिल वरघडे, कृष्णा घिसरे आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजप तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण यांनी केले. आभार भाजप विद्यार्थी तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.