Vadgaon News : मावळ शिवसेनेच्यावतीने आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत आदिवासी बांधवांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मावळ शिवसेनेच्यावतीने जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करून या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्यात आला आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शननुसार ही मदत वाटप करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिली.

शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांच्या वतीने वडेश्वर ( ता. मावळ) येथील सटवाईवाडी येथील 60 आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे किट वाटप करण्यात आले.

सरपंच संतोषी खांडभोर, ग्रामपंचायत सदस्य शंकर हेमाडे, अनंता हेमाडे, शिवराम शिंदे व सदस्या रुपाली सुपे, शिवसेना शाखा प्रमूख दिलीप खांडभोर, बबन भुरुक, लक्ष्मण चिमटे, आर्यन खांडभोर यांच्या हस्ते सोशल डिसटिंग पाळून आदिवासी बांधवांना किट वाटप करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.