Vadgaon News : मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीकडून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध

एमपीसी न्यूज – मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकाचा निषेध करून एलईडी स्क्रीनद्वारे व स्वाक्षरी मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयोजित पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या विधेयकाचा निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने शेतकरी व कामगार यांच्या हिता विरुद्ध संबंधित केलेला कायद्याचा निषेध करून तसेच मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली.

या जनजागृतीसाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, महिला तालुकाध्यक्षा सीमा आनंदे, युवक अध्यक्ष विलास मालपोटे, तळेगाव शहराध्यक्ष भानुदास खळदे, वडगाव शहराध्यक्ष गोरख ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत निषेध व जनजागृती करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी बाळकृष्ण ढोरे, चंद्रकात राऊत, सहादू आरडे, शांताराम नरवडे, खंडूजी तिकोणे, विशाल वाळुंज, जितेंद्र खळदे, बाळासाहेब चव्हाण, बाळू ढोरे, सुनील कोद्रे, सिद्धेश ढोरे, महेंद्र ढोरे, यशवंत शिंदे आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे व तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे म्हणाले केंद्र सरकारने शेतकरी व कामगार यांच्या हिताविरूद्ध हा कायदा केला असून या कायद्यामुळे शेतकरी व कामगार वर्गाला नुकसान सोसावे लागणार आहे.

यावेळी या कायद्याचा निषेध करून मोठया प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबवून जनजागृती करण्यात आली तसेच जनजागृतीसाठी एलईडी स्क्रीनही लावण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.