Vadgaon maval News : मावळची संजय गांधी योजना पुन्हा निराधार; नायब तहसीलदार झाले सेवानिवृत्त

एमपीसीन्यूज : मावळ तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेचे नायब तहसीलदार नंदकुमार बाबुराव धनगर सेवानिवृत्त झाल्याने अवघ्या चार महिन्यांत पुन्हा संजय गांधी योजना शाखा निराधार झाली आहे.

या शाखेचा अतिरिक्त कार्यभार महसूलचे नायब तहसीलदार प्रसन्न केदारी यांच्याकडे सोपविण्यात आला.

नायब तहसीलदार किशोर मारगमवार यांची 2014 साली बदली झाली. तेव्हापासून संजय गांधी योजना शाखेचा कार्यभार महसूल, निवडणूक व निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला होता.

महसूलचे नायब तहसीलदार समीर यादव यांच्या बदली झाल्यानंतर हे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त होते.

तब्बल सहा वर्षांनी संजय गांधी योजना शाखेच्या नायब तहसीलदार धनगर यांची नियुक्ती झाली. पण चार महिन्यातच ते सेवानिवृत्त झाले.

मावळ तालुक्यातील विधवा, निराधार, अपंग, श्रावणबाळ व आर्थिक दुर्बल आदी घटकांचे काम पूर्ण वेळ असते. म्हणून रिक्त झालेल्या जागी तातडीने नवीन नायब तहसीलदार नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.