Vadgaon News : परमार्थ साधण्यासाठी परनारी आणि परद्रव्याची अभिलाषा धरू नये – निवृत्तीमहाराज देशमुख

0

वडगाव मावळ – ‘जीवनात परमार्थ साधू इच्छिणाऱ्यांनी परनारी आणि परद्रव्याची अभिलाषा धरू नये. मग त्याच्या घरी भाग्याने देव राहायला येतील आणि सर्व संपत्ती आणि वैभवही येईल,’ असे निरूपण हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले.

वडगाव मावळ येथील सुभाषराव जाधव यांची श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा वडगावकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार व किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी वडगाव मावळ येथे ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री मदन बाफना, आमदार सुनील शेळके, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हापरिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ज्येष्ठ नेते विठ्ठल शिंदे, अशोक बाफना, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, शिवाजी पवार, दिलीप दगडे, सुभाष राक्षे,शामराव राक्षे,अनिल लोखंडे, ॲड.  मुकुंदराव आवटे,  ॲड. नामदेव दाभाडे,  मंगेश  ढोरे, अशोक घारे, तुकाराम ढोरे, सुनिल चव्हाण, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, काळूराम मालपोटे, चंद्रकांत ढोरे, गंगाराम ढोरे, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, अनंता कुडे, किरण भिलारे, नगरसेवक राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, माया चव्हाण, शारदा ढोरे, पूजा वहिले, पुनम जाधवसह ग्रामस्थ व तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

हभप निवृत्ती महाराज देशमुख पुढे म्हणाले की प्रयत्न आणि प्रारब्ध ह्या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रयत्न चांगले असतील तर प्रारब्ध बदलेल असे नाही. जर प्रारब्ध चांगले असेल तर त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. नेहमी सकारात्मक विचार ठेवा यश निश्चित आहे. समाजासाठी केलेले काम कधीच वाया जात नसून मनुष्य मोठा व्हायला कोणाचा तरी पाठीशी आशीर्वाद असावा लागतो.

याप्रसंगी सुभाषराव जाधव यांचा भक्ती- शक्ती सन्मान चिन्ह, मानपत्र, ऊसाची मोळी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी मनोगते व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

एकूणच शेती बाबत बोलताना देशमुख महाराज म्हणाले आताच्या परिस्थितीत शेती ही निसर्गाधीन झालेली आहे. ऊस हे पीक शाश्वत आहे. इतर पीकांबाबत हमी देतात येत नाही, मात्र आताच्या घडीला ऊस हे पीक शेतक-यांना उत्पन्न देणारे आहे. शेतकरी हा राजा आहे, पण निसर्गाने धोका दिल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. असे ही हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी सांगितले.

प्रास्ताविक विशाल वहिले, सूत्रसंचालन गणेश विनोदे यांनी केले तर ‘सन्मानपत्र वाचन’ अतुल राऊत तर आभार मंगेश खैरे यांनी मानले.

संयोजन विशाल वहिले, गणेश विनोदे, मंगेश खैरे, अरुण वाघमारे, आफताब सय्यद, अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.