Vadgaon News : तहसिल कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

मोदी, योगी यांचे सरकार दडपशाहीचे- बबनराव भेगडे

एमपीसी न्यूज – हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ व केंद्र सरकारचे कामगार व शेतीविषयक धोरण तसेच केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशचे योगी सरकार हे दडपशाहीचे सरकार असल्याचा आरोप मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी यावेळी केला.

सोमवार (दि 5) रोजी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हाथरस घटनेच्या निषेधार्थ तहसिल कार्यालयवर मोर्चा काढून तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, महिला तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत, वडगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, तळेगाव शहर महिला अध्यक्षा सुनिता काळोखे, देहूरोड महिला अध्यक्षा शितल हगवणे, महाराष्ट्र प्रदेश सेवा दल अध्यक्ष दीपक मानकर, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बालगुडे, माजी सरपंच तुकाराम तथा बुवा ढोरे, लोणावळा शहर माजी अध्यक्ष राजू बोराटी, देहूरोड शहर अध्यक्ष कृष्णा दाभोळे, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष वि म शिंदे, माजी अध्यक्ष नारायण पाळेकर, वडगाव शहराध्यक्ष राजेंद्र कुडे, माजी सरपंच तानाजी दाभाडे, नवलाख उंब्रेचे सरपंच दत्तात्रय पडवळ, सरचिटणीस सुदाम कदम, ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस विशाल वहिले, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे, नवनाथ चोपडे, राजेश बाफना, प्रवीण ढोरे, सोमनाथ धोंगडे, भाऊसाहेब ढोरे, मनोज येवले, उपाध्यक्षा शैलजा काळोखे, वडगाव शहर महिला अध्यक्षा ज्योती जाधव आदी उपस्थित होते.

तालुका अध्यक्ष भेगडे बोलताना पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आहे. तेथील भाजपाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री योगी यांनी राजीनामा द्यावा.

यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे, वडगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे यांनीही आपल्या मनोगतात केंद्रासह उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.