Vadgaon News : नगरसेवक प्रसाद अरविंद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन 

0

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील नगरसेवक प्रसाद अरविंद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, वडगांव मावळ यांच्या मार्फत सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यांमध्ये प्रामुख्याने 101 वाहनांची मोफत PUC चाचणी आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

नगरपंचायत वडगाव मावळ येथील सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांचा “सेवाव्रती सन्मान” सोहळा
श्रीमंत महादजी शिंदे रिक्षा आणि टेम्पो संघटना यांच्या सर्व सदस्यांचा कोरोना कालावधीत सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेल्या वाहतूक सेवेबद्दल सन्मान सोहळा संपन्न झाला, या निमित्ताने सर्व रिक्षांना कोरोना प्रोटेक्शन शीट देखील प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर होते. माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे , भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आदींनी या प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या मनोगतात भास्करराव म्हाळसकर यांनी भारतीय जनता पक्ष सदैव सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला तत्पर उभा असेल अशी ग्वाही दिली.

मावळ तालुका भाजपचे माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजप गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक प्रविण चव्हाण, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वडगांव शाखेचे अध्यक्ष नारायणराव ढोरे, जेष्ठ नेते विठ्ठलराव घारे , मा.ग्रा.पं सदस्य बाळासाहेब भालेकर, वडगांव शहर महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे, अॅड.अर्चना ढोरे आदींनी शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी आपल्या मनोगतात पुढील काळात देखील अशीच सेवाकार्ये सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.

श्री.पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, जेष्ठ नेते सोपानराव ढोरे , मा.सभापती रेवतीताई वाघवले, पंढरीनाथ भिलारे , अरविंद पिंगळे, बाळासाहेब कुडे, गोपाळराव भिलारे , वडगांव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर, दिपक बवरे, सोमनाथ काळे , सुरेश भंडारी, ज्ञानेश्वर घारे, आनंदराम मुथा, नगरसेवक अ‍ॅड.विजय जाधव , किरण म्हाळसकर , दिलीप म्हाळसकर , शाम ढोरे, सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर , मावळ तालुका युवा मोर्चा सरचिटणीस रविंद्र काकडे, गणेश भेगडे, नामदेव ढोरे, शंकर भोंडवे,दिपक भालेराव, मनोज गुजराणी , प्रज्योत म्हाळसकर , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष विकी म्हाळसकर , क्रीडा आघाडी अध्यक्ष महेश म्हाळसकर , नामदेव भसे, प्रा.विकास पिंगळे, मावळ तालुका महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली ढोरे, वैशाली म्हाळसकर , संगीताताई, नगरपंचायतचे कर्मचारी बंधू भगिनी, श्रीमंत महादजी शिंदे रिक्षा आणि टेंपो संघटनेचे सर्व सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वडगांव भाजपा शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी स्वागत केले , मावळ तालुका भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी सूत्रसंचालन केले, युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like
Leave a comment